About Us
मोहन सर्जेराव शिंदे.
संस्थापक अध्यक्ष
अनिल सिताराम सावंत.
सचिव
छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर,व महात्मा फुले तसेच छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाचा पाया रचला त्याचा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून गावोगावी भटकंती करणाऱ्या भटक्या व गरीब अनाथ निराधार मुलांच्या उज्वल भविष्यासाठी व शिक्षणाचा हक्क मिळवून देण्याच्या या उद्देशाने माहे 11ऑगस्ट 2022 मध्ये मोहन शिंदे.अनिल सावंत यांनी ज्ञानप्रसारक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या संस्थेची स्थापना केली.स्वतः अशिक्षित व भटक्या समाजातील असल्याने गावोगावी फिरणाऱ्या समाजातील अडचणी सोडवण्यासाठी व मुलांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी ब्राह्मणी येथे यासंस्थे मार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृहा ची सुरुवात केली. संस्थेच्या व्यवस्थापनासह निवासी वस्तीगृहा चे दैनंदिन कामकाज संभाळण्यासाठी हि ते महत्वाचे काम करतात. आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृहात मुली/मुले एकूण 52 अनाथ निराधार व समाजातील अपेक्षित मुले, मुली या संस्थेत आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्व साधारण जिवन जगायचे म्हनटल तरी यासर्व वस्तू लागतात ते म्हणजे अन्न.वस्त्र.निवारा.व वैदयकीय ,या सर्व गरजा व जबाबदाऱ्या संस्थे मार्फत पूर्ण केल्या जातात. मुलांना शिक्षण बरोबरच मूल्य संस्कार , क्रीडा विषयक सुविधा संस्थेमार्फत दिल्या जातात. भविष्यात या कामाची व्याप्ती वाढवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत संस्थेचे कार्य पोहोचवण्यासाठी व जास्तीत जास्त वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी इतरांच्या सहकार्याने संस्था कार्यरत राहणार आहे .
छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर, व महात्मा फुले तसेच छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाचा पाया रचला त्याचा एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून समाजामध्ये असाणारे शाळाबाह्य,स्थलांतरित,बेघर व अनाथ निराधार शिक्षकांना पासुन वंचित असणारे मुले व मुली यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व त्यांचे उज्वल भविष्य घडविणे हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृहातचे ध्येय आहे
छत्रपती शिवाजी महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा फुले तसेच छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाचा पाया रचला त्यांचे एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून ज्ञानप्रसारक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृहा चे उद्घाटनाच्या वेळी प्रमुख उपस्थिती पाहुणे विक्रमराव तांबे (जिल्हा परिषद सदस्य)महेश सूर्यवंशी (पंचायत परिषद सदस्य) विजय सुरवंशी एकलव्य संघटनेचे (अध्यक्ष)घाडगे साहेब ब्राह्मणी गावचे (ग्रामसेवक) जालू पाटील हापसे ब्राह्मणी गावची (पोलीस पाटील) रवी वैरागर (ग्रामपंचायत सदस्य) रघुनाथ मोकाटे ब्राह्मणी गावची (मुकादम)प्रसाद बानकर ,विजय बानकर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन सर्जेराव शिंदे व संस्थेचे सचिव अनिल सिताराम सावंत व संस्थेचे पदाधिकारी तसेच गणेश हापसे(पत्रकार) इ.यांच्या हस्ते 11 ऑगस्ट 2022 या रोजी उद्घाटन समारंभ करण्यात आले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन सर्जेराव शिंदे राजर्षी छत्रपती शाहू महाराज निवासी वसतिगृहत शाळाबाह्य स्थलांतरित बेवारस अनाथ निराधार मुलांना हक्काचा निवारा केला तसेच ते बोलले की गावचे नाही महाराष्ट्राचे तर देशाचे नाव नावलौकिक होईल असे स्पष्ट केले तसेच संस्थेचे सचिव अनिल सिताराम सावंत यांनी अनुवादन केले.